जागतिक नंबर एक टेनिसपटू नोवाक जोकोविकने झेक प्रजासत्ताकच्या सातव्या मानांकित टॉमस बर्डीचचा सरळ सेटमध्ये पराभव करीत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
रोलँड गार्रोस कोर्टवर झालेल्या या उपांत्यपूर्व लढतीत जोकोविकने बर्डीचचे आव्हान ६-३, ७-५, ६-३ असे संपुष्टात आणले. आता आपले पहिले फ्रेंच ओपन जेतेपद जिंकण्यासाठी तो दोन पावले दूर आहे. उपांत्य फेरीत त्याची गाठ ऑस्ट्रेलियचा युवा खेळाडू टायरो डॉम्निक थिएमशी पडणार
आहे.
टायरो डॉम्निक थिएम
प्रथमच उपांत्य फेरीत
दरम्यान, युवा खेळाडू डॉम्निक थिएमने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनवर मात करीत प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
युवा डॉम्निकने गोफिनचे आव्हान ४-६ ७-६(७) ६-४ ६-१ असे मोडित काढले. आता उपांत्य फेरीत त्याची गाठ जागतिक अग्रमानांकित खेळाडू नोवाक जोकोविकशी पडेल.
सानिया-डोडिग, पेस-हिंगिस
मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत
दरम्यान, भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने क्रोएशियाच्या इवान डोडिगच्या साथीत खेळताना फ्रेंच ओपन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर अन्य एका उपांत्यपूर्व लढतीत भारताचा अनुभवी खेळाडू लिअँडर पेसने स्वित्झरलँडच्या मार्टिना हिंगिसच्या साथीत खेळताना अंतिम चारात स्थान मिळविले. द्वितीय मानांकित सानिया-डोडिग यांनी यंग जान चान व मॅक्स मिर्नयी या सातव्या मानांकित जोडीवर ६-१, ३-६ १०-६ अशी मात केली. यापूर्वी सानियाने २०१४च्या यूए ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. त्यावेळी त्याचा साथीदार होता ब्राझीलचा ब्रूनो सोरेस. उपांत्य फेरीत आता सानिया-डोडिगची गाठ क्रिस्टिना मालडेनोविच व पियरे ह्यूज हरबर्ट या तिसर्या मानांकित जोडीशी पडेल. त्यांनी बॉब ब्रायन व कोको वेंडवेगे या आठव्या मानांकित अमेरिकन जोडीला २-६ ६-२ १३-११ असे नमवित उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या अन्य एका सामन्यात लिअँडर पेस आणि मार्टिना हिंगिस यांनी पाचव्या मानांकित ब्रुनो सुआरीस व इलेना वेस्निना यांच्यावर ६-४, ६-३ अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली. या विजयामुळे पेस-हिंगिस यांना एकूण १११ गुणांपैकी ६० गुण प्राप्त झाले.