>>२ सराव सामने तर चार कसोटी खेळणार
भारतीय नियामक मंडळाने काल टीम इंडियाच्या वेस्ट इंडीज दौर्याची घोषणा केली. त्यानुसार टीम इंडिया जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौर्यावर जाणार असून तेथे ते २ सराव सामने तसेच चार कसोटींची मालिका खेळणार आहे.
टीम इंडियाचा हा दौरा ४९ दिवसांचा असेल. भारतीय संघ ६ जुलै रोजी वेस्ट इंडीजच्या सेंट किट्समध्ये पोहोचेल. तेथे ते वॉर्नर पार्कमध्ये ९ जुलैपासून आपला पहिला सराव सामना खेळतील. त्यानंतर १४ ते १६ जुलैपर्यंत वॉर्नर पार्कवरच तीन दिवशीय सामना खेळतील.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना २१ ते २५ जुलैपर्यंत अँटिग्वात होईल. दुसरा कसोटी सामना ३० जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत जमैकाच्या सबिना पार्क मैदानावर, तिसरा सामना ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्टपर्यंत सेंट लुसियाच्या डॅरेन सॅमी स्टेयिडमवर खेळतील. तर १८ ते २२ ऑगस्टपर्यंत पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वींस पार्क ओव्हलवर होणार्या चौथ्या लढतीने या दौर्याची सांगता होईल. २३ ऑगस्ट रोजी टीम इंडिया तेथून स्वदेशी रवाना होईल.
वेस्ट इंडीज दौर्यासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, स्टुअर्ट बिन्नी.