प्रादेशिक आराखडा तालुकावार खुला करणार : उपमुख्यमंत्री

0
93

>>पहिली बैठक १९ रोजी निश्‍चित

प्रादेशिक आराखडा सुधार समितीचे काम आता युध्द पातळीवर सुरू होणार असून तालुकावार आराखडा खुला केला जाईल, असे सांगून पहिली बैठक येत्या दि. १९ रोजी निश्‍चित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी दिली. सासष्टी व बार्देशमध्ये जास्त हरकती म्हणजे दीड हजारांवर आल्या आहेत. अन्य तालुक्यांमध्ये हरकतीचे प्रमाण कमी आहे. प्रत्येक तालुक्यातील आराखड्याची सुधारणा करून आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या जुलैपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करणे शक्य होईल, असे डिसोझा यांनी सांगितले.

गोमेकॉवर प्रशासक नेमणार

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार सुधारण्याची गरज असून गोमेकॉवर प्रशासक नियुक्त करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. डिसोझा यांनी सांगितले.