श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश प. पू. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींच्या गुरुपीठ रोहणाचा ४१ वा वर्धापनदिन व मठाचा ५४० वा संस्थापक दिन आज दि. २२ रोजी पर्तगाळी मठात साजरा होत असून या सोहळ्यात श्री विद्याधिराज पुरस्कार व जीवोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सायंकाळी ४ वाजता विशेष समारंभात हुबळी येथील उद्योजक रामचंद्र रंगप्पा कामत यांना श्री विद्याधिराज पुरस्कार तर मंगळूर येथील उद्योजक एस. प्रभाकर कामत व कुमठा येथील चाटर्ड अकौंटंट गणपती श्रीधर कामत यांना जीवोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी सुवर्ण मंडपाचे वितरण श्रीस्वामीजींच्या मंगल हस्ते होणार आहे.