सुरक्षा रक्षकांचे साखळी उपोषण सुरू

0
131

आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या १ फेब्रुवारीपासून संपावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी सरकारने आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कालपासून साखळी उपोषण सुरू केले. काल पहिल्या दिवशी १० जणांनी उपोषण केले असे या सुरक्षा रक्षकांचे नेते ऍड्. अजितसिंह राणे यांनी सांगितले. येत्या २५ रोजीपर्यंत हे साखळी उपोषण चालू राहणार असून २५ रोजी गोवा विधानसभेवर महामोर्चा नेण्यात येणार असल्याचे राणे म्हणाले. या महामोर्चात या सुरक्षा रक्षकांबरोबरच खाणी बंद पडल्याने बेरोजगार बनलेले लोक, शेतकरी, गाडेवाले, मच्छीमार, रेती व्यवसायातील लोक, कंत्राटी कामगार आदी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहे.