खलाश्यांकडे ओळखपत्रे नसल्याने कसून चौकशी
गोव्याच्या समुद्रात घुसलेला कन्याकुमारी येथील एक मच्छीमारी ट्रॉलर काल भारतीय तटरक्षक दलाने पकडून गोवा किनारी पोलिसांच्या स्वाधीन केला. ‘सेल्वा माथा’ असे सदर मच्छीमारी ट्रॉलरचे नाव असून इंजीन बंद पडल्याने तो भरकटत गोव्याच्या समुद्र क्षेत्रात आला होता. गस्तीवर असलेल्या तटरक्षक दलाने या ट्रॉलरला घेरून तो ताब्यात घेतला. तथापि, ट्रॉलरवरील खलाश्यांकडे आवश्यक ओळखपत्रे नसल्याने ट्रॉलरसह कर्मचार्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. खारीवाडा मच्छीमारी जेटीवर हा ट्रॉलर नांगरून ठेवण्यात आला असून अधिक तपास किनारी पोलीस करीत आहेत.
भारतीय स’ुद्र क्षेत्रात अतिरेकी घुसण्याच्या पार्श्वभू’ीवर भारतीय तटरक्षक दल डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. ३१ डिसेंबरला गुजरात’धील पोरबंदर स’ुद्रात अशाच एका संशयास्पद ट्रॉलरचा भारतीय तटरक्षक दलाने पाठलाग केला असता ट्रॉलरवरील कर्’चार्यांनी तो स्फोट घडवून उडवून दिला होता.
काल वास्को समुद्रात पकडलेला ट्रॉलर केरळच्या मच्छीमारांचा असला तरी, या ट्रॉलरवरील खलाश्यांकडे ओळखपत्रे नसल्याने किनारी पोलीस सर्वांची कसून चौकशी करीत आहेत.