भूसंपादन विधेयकाविरोधात अण्णा हजारेंना कॉंग्रेसची साथ

0
101

केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाला विरोध करणार्‍या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक पत्र लिहून कळविले आहे. सध्या संसदेमध्ये मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेले केंद्र सरकारचे भूसंपादन विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचे नसल्याचे सोनियांनी पत्रात म्हटले आहे. या विधेयकाच्या विरोधात सर्व सहकार्य करण्यात तयार असल्याचे नमूद करून मंगळवारी सर्व विरोधी पक्षांनी काढलेला मोर्चाचे उदाहरण दिले आहे.