‘गोवंश रक्षा’ची मागणी
महाराष्ट्र राज्य सरकारप्रमाणेच गोवा सरकारनेही राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी काल ‘गोवंश रक्षा अभियान-गोवा’ने पत्रकार परिषदेतून केली. गोवंश हत्या बंदी कायदा लागू करणारे महाराष्ट्र सरकार अभिनंदनास पात्र असून संपूर्ण देशात हा कायदा लागू करण्याची गरज असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी सांगितले. गोव्यात बेकायदेशीररित्या अन्य राज्यातून जे कुजके गोमांस पाठवण्यात येत असते, त्यावर कारवाई केली जावी. तसेच राज्यातील बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्यात यावे, असे परब म्हणाले. गायी, बैल, वासरे यांच्या कत्तलीवर पूर्णपणे बंद आणावी. त्यासाठी गोवंश हत्या बंदी कायदा लागू करावा, असे परब म्हणाले.
गोवंश हत्या बंदीच्या मागणीसाठीचा लढा लवकरच आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.