दहशतवाद्यांसह १५ पाकिस्तानी कैद्यांची लवकरच सुटका

0
90

जम्मू-काश्मीर गृह खात्याकडून मान्यता
मसरत आलम याच्या सुटकेचे प्रकरण गाजत असतानाच जम्मू-काश्मीर सरकारने राज्यातील विविध तुरुंगामधील दहशतवाद्यांसह १५ पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्यास मान्यता दिली आहे.या निर्णयानुसार ज्या दहशतवाद्यांची सुटका केली जाणार आहे त्यात लष्करे तैयबा व हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांच्या प्रत्येकी पाच दहशतवाद्यांचा समावेश आहे. हे दहशतवादी सध्या श्रीनगरमधील तुरुंगात आहेत.
दहशतवाद्यांसह भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या अन्य पाकिस्तानी नागरिकांचा सुटकेच्या तारखांची निश्‍चिती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्याच्या गृह खात्याने त्यांच्या सुटकेला अलीकडेच मान्यता दिल्याचे या सूत्रांनी सांगितले.
तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांवर नागरीक तसेच सुरक्षा दलाच्या जवानांना ठार केल्याचे आरोप आहेत. ३०२ आरपीसी, शस्त्रास्त्र कायदा, बेकायदेशीर कारवाया व विदेशी कायदा अशा विविध कलमांखाली या पाकिस्तानी कैद्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
राज्याचे तुरुंग उपमहानिरीक्षक महंमद सुलतान लोने यांनी वरील माहितीला दुजोरा दिला. वरील कैद्यांच्या हद्दपारीची औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या.