‘त्या’ १४५ कर्मचार्‍यांची क्रीडा खात्यासमोर निदर्शने

0
109

गेल्या नोव्हेंबरमध्ये क्रीडा युवा व्यवहार खात्याच्या सेवेतून कमी केल्याने बेरोजगार बनलेल्या १४५ कर्मचार्‍यांनी काल युवा व्यवहार खात्यासमोर धरणे धरून निदर्शने केली. विधानसभा अधिवेशनाच्या काळात विधानसभेवर मोर्चा नेण्याचे कामगार नेते अजीत सिंग राणे यांनी जाहीर केले.गेल्या ३ वर्षांपूर्वी वरील कर्मचार्‍यांना सेवेत घेतले होते. दरम्यानच्या काळात न्याय मिळविण्यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तसेच अन्य मंत्र्यांची भेट घेतली होती. पर्रीकर यांनी त्यांना न्याय देण्याचे आश्‍वासन दिले होते, असे राणे यांनी सांगितले.