विदेशात होणार्या ट्रॅवल मार्टवर करोडो रुपये खर्च करणार्या भाजप सरकारने गेले दोन महिने पोलिसांना तेराव्या महिन्याचे वेतन दिले नाही. ते त्वरित वितरीत करण्याची मागणी कॉंग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली. पोलिसांना आठवड्याची सुटी नसते. त्यांना झोपही मिळत नाही. जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस महत्वाचे काम करतात. त्यामुळे त्यांना वरील वेतनाची गरज असते. त्यांना वेतन देण्यास विलंब करणे हा त्यांच्यावरील अन्याय होय, असे कवठणकर म्हणाले. वरील प्रकरणी आज आपण मुख्य सचिवांना निवेदन सादर करणार, अशी माहिती कवठणकर यांनी दिली. सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला असेल तर कोळशाच्या आयातीवरील कर कमी का केला. त्याचा फायदा फक्त अदानी यांनाच झाल्याचे कवठणकर म्हणाले.