उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे माजी मंत्री नंदगोपाल नंदी यांच्या अलाहाबादमधील मुठ्ठीगंज येथील कार्यालयाबाहेर झालेल्या बॉंबस्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे उत्तर प्रदेशात होळीच्या उत्सवावर विरजण पडले. या दुर्घटनेतील मृत व्यक्तीचे नाव राम चौरासिया असे असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. यापूर्वी २०१० मध्ये अशाच प्रकारे नंदी यांच्या घराबाहेर स्फोट होऊन एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता.