आपमधील अंतर्गत संघर्षावर प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची उचलबांगडी करत पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी काल आपचे नेते मयांक गांधी यांनी केजरीवाल यांनी संजोजकपदाचा राजीनामा देण्याची धमकी दिल्याने वरील दोघांवर कारवाई झाल्याचे म्हटल्याने पक्षातील वाद अजून चालूच असल्याचे सिद्ध झाले आहे. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा तपशील गांधी यांनी ब्लॉगद्वारे जाहीर केला आहे. त्यात त्यांनी अरविंद केजरीवाल यांनी योगेंद्र यादव व प्रशांत भूषण पक्षाच्या राजकीय समितीमध्ये असतील तर संयोजकपदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली होती असे म्हटले आहे. केजरीवाल यांनी आपल्याला या गोष्टीची वाच्यता न करण्यास सांगितले होते असेही त्यांनी म्हटले आहे.