आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अखेर महेंद्रसिंग धोनीने मौन सोडले. या प्रकरणी आपल्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही असे वक्तव्य धोनीने काल येथील पत्रकार परिषदेवेळी केले. आपल्याविरुद्ध पुरावा नसतानाही या प्रकरणात आपले नाव घेणे सुरूच राहील असेही धोनी म्हणाला. आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी मुदगल समितीने दिलेल्या १३ खेळाडूंच्या यादीत धोनीचेही नाव असल्याची चर्चा आहे. मात्र ही यादी अद्याप जाहीर झालेली नाही. या गोष्टींची आता आपल्याला सवय झाली असल्याचे धोनीने यावेळी सांगितले.