मराठीतील नामवंत समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी काल दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. मराठी व इंग्रजीतून हातकणंगलेकर यांनी १५ पुस्तके लिहिली आहेत.