फा. जोसेफ वाझ यांना श्रीलंकेत संतपद बहाल

0
122
कोलंबो येथील समुद्र किनार्‍यावर आयोजित खास भव्य सोहळ्यात मूळ गोमंतकीय फा. जोसेफ वाझ यांना हजारों ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत पोप फ्रान्सिस यांनी संतपद बहाल केले त्यावेळी.

पोप फ्रान्सिस यांच्याकडून गौरव
मूळ गोमंतकीय असलेले ख्रिस्ती धर्मगुरु जोसेफ वाझ यांना काल येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात पोप फ्रान्सिस यांच्या हस्ते संतपद बहाल करण्यात आले.येथील समुद्र किनार्‍यावर आयोजित या खास सोहळ्याला हजारो ख्रिस्ती भाविकांनी उपस्थिती लावली. गोव्यातूनही या सोहळ्याला मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव गेले आहेत. १७व्या शतकातील जोसेफ वाझ हे अलीकडील काळात नागरी युध्दात सापडलेल्या श्रीलंकेला राष्ट्रीय सलोख्यासाठी एक आदर्श व्यक्तीमत्व ठरणार असल्याचे प्रतिपादन पोप फ्रान्सिस यांनी यावेळी केले.
जोसेफ वाझ यांचा जन्म १६५१ साली गोव्यात झाला होता. नंतर १६८७ साली ते श्रीलंकेला गेले. १७११ साली त्यांचे निधन झाले. तोपर्यंत त्यांनी श्रीलंकेत केलेल्या कार्याबद्दल त्यांना ‘अपोस्टल ऑफ श्रीलंका’ म्हणून गौरविण्यात आले होते.
श्रीलंकन चर्चला वाझ यांचा वारसा पुढे चालू ठेवायचा असल्याचे पोप फ्रान्सिस यांनी सांगितले. धार्मिक स्वातंत्र्य हा मूलभूत मानवी हक्क असल्याचेही ते म्हणाले.