जावा समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर एशिया विमानातील दोन पैकी एक ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर काल शोधपथकांनी ताब्यात घेतले. स्थानिक वेळेनुसार काल सकाळी ७.१५ वा. ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर पाणबुड्यांनी वर काढल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचे इंडोनेशियाच्या शोध मोहिमेचे प्रमुख बंबांग सोलिस्तियो यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. ब्लॅक बॉक्स तथा फ्लाईट डेटारेकॉर्डर विमानाच्या अवशेषांच्या ढिगार्याखाली होते. ते वर काढून एका जहाजाद्वारे आणण्यात आले असून ते तपासकामासाठी जाकार्ता येथे आणण्यात येईल. दरम्यान, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर वरील ब्लॅक बॉक्स सापडल्याच्या ठिकाणाहून समुद्रात सुमारे २० मीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले.