ढिगार्यातून आज वर काढणार
अखेर समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर एशियाच्या विमानातील ब्लॅक बॉक्सचा ठावठिकाणा शोध पथकांना काल लागला. जावा समुद्राच्या तळाशी ढिगार्याखाली हे ब्लॅक बॉक्स असून आज सोमवारी ते वर काढण्यात येईल अशी माहिती इंडोनेशियाच्या प्रशासकीय अधिकार्यांनी दिली. ब्लॅक बॉक्स ताब्यात आल्यानंतर या दुर्घटनेच्या कारणावर प्रकाश पडणार आहे.सदर विमान दुर्घटनाग्रस्त होऊन दोन आठवडे उलटल्यानंतर शोध पथकांना ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. इंडोनेशियाच्या सागरी वाहतूक खात्याचे महासंचालक टोनी बुदिओनो यानी याला दुजोरा दिला. इंडोनेशियाच्या नौदलाच्या पाणबुड्यांना जावा समुद्रात ३० ते ३२ मीटर खोल ब्लॅक बॉक्स असल्याचे दिसून आले आहे. मात्र ढिगार्यांमध्ये ते अडकून राहिल्याने ते वर काढणे पाणबुड्यांना काल शक्य झाले नाही. आज ते वर काढण्यात यश येईल असे बुदिओनो यांनी सांगितले.
आज ब्लॅक बॉक्स ढिगार्यातून बाहेर काढण्यात अपयश आल्यास ‘बलून’ पध्दतीचा वापर करण्यात येईल. याच पध्दतीने विमानाचा शेपटाचा भाग वर काढण्यात आला होता असे त्यांनी सांगितले. २८ डिसेंबर रोजीच्या या दुर्घटनेत १६२ जणांना जलसमानी मिळाली होती. मात्र आतपर्यंत त्यापैकी ४८ मृतदेह मिळाले आहेत.