मे महिन्यापर्यंत राज्यात २५ विदेशी क्रूझ बोटी येणार

0
112

एमपीटी खास क्रूझ टर्मिनल उभारणार
पुढील मे महिन्यापर्यंत आलिशान आरामदायी क्रूझ बोटींद्वारे सुमारे ३१ हजार विदेशी पर्यटन गोव्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल दिली.
सर्वाधिक विदेशी नागरिक ३ मे रोजी आयदा प्रायमा या बोटीतून गोव्यात दाखल होणार आहेत. त्यातील पर्यटक संख्या ३३०० एवढी असेल. जास्त पैसे खर्च करण्याची क्षमता असलेल्या या श्रीमंत विदेशी नागरिकांना गोव्यात आणण्याच्या कामी मुरगांव पोर्ट ट्रस्टने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे परुळेकर म्हणाले. पर्यटन खात्याच्या मदतीने मुरगांव पोर्ट ट्रस्टने यंदाच्या मोसमात आतापर्यंत अशा आठ विदेशी प्रवासी बोटी गोव्यात आणल्या आहेत.‘आयदा सोल’ ही बोट सर्वांत प्रथम म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी २२०३ पर्यंटकांना घेऊन मुरगांव बंदरात आली. तद्नंतर ‘व्हीयेजर’ व ‘आयदा ऑरा’ या २७ नोव्हेंबर रोजी मुरगांव बंदरात दाखल झाल्या. या बोटीतून अनुक्रमे ४६३ व ११७७ श्रीमंत पर्यटक गोव्यात आले. तद्नंतर गोव्यात ङ्गआझमारा क्वेस्टाफ, ङ्गसेव्हन सिज व्हॉयेजरफ व ङ्गनॉटिकाफ या तीन बोटी २८, २९ व ३० नोव्हेंबर अशा लागोपाठ मुरगांव बंदरात दाखल झाल्या. त्यातून अनुक्रमे ६१०, ६७२ व ५९२ पर्यटक गोव्यात दाखल झाले. नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे सहा पर्यटक बोटी राज्यात दाखल झाल्या व केवळ १० दिवसांच्या अंतराने आलेल्या बोटीतून ५७१७ विदेशी पर्यटक गोव्यात आले. तर डिसेंबर महिन्यात दोन बोटी दाखल झाल्या व त्यातून २२०० प्रवासी गोव्यात आले. डिसेंबर महिन्यापर्यंत या बोटीतून गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांची संख्या ७९१७ एवढी होती. त्यात अमेरिकी, कॅनडा, व ब्रिटन येथील पर्यटकांचा समावेश होता. आणखी अशा २५ बोटी गोव्यात दाखल होणार असून त्याद्वारे मे महिन्यापर्यंत ३०४९४ पर्यटक गोव्यात येणार आहेत, असे परुळेकर यांनी सांगितले.
त्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुरगांव पोर्ट ट्रस्ट ८.७९ कोटी रु. खर्चून क्रुज बर्थ टर्मिनल उभारणार असल्याची माहितीही परुळेकर यांनी दिली.