पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी निवडणूक लढविल्यास त्यांच्या पराभवासाठी वावरण्याची तयारी बाबुश मोन्सेर्रात यांच्या समर्थकांनी केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी फुर्तादो यांच्या नावाला मान्यता दिली आहे, असे असले तरी त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून कॉंग्रेसच्या पणजीतील अनेक नेत्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीत कोणत्याही कॉंग्रेस पदाधिकार्याने किंवा कार्यकर्त्यांने पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी दिला आहे.