आज दि. २५ रोजीच्या नाताळसणाच्या स्वागतासाठी ख्रिश्ती बांधवांनी पूर्ण तयारी केली असून काल मध्यरात्री राज्यातील वेगवेगळ्या चर्चमध्ये प्रार्थना झाल्या. काल संध्याकाळी नाताळाच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती. वाहतुकीची कोंडी झाली. आजपासून नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होईल. शहरात पर्यटकांचीही गर्दी आहे.