द्रमुक नेते नेपोलियन भाजपात

0
94

२०१६ साली तामीळनाडूत होणार्‍या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून भाजपाने शक्ती वाढविण्यास प्रारंभ केला असून काल द्रमुक नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नेपोलियन यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाला उत्तरेत अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी केंद्रीय मंत्र्यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधींना धक्का बसला आहे. नेपोलियन तामीळनाडूतील आघाडीचे चित्रपट कलाकार आहेत. पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण भाजपात प्रवे केला असल्याचे श्री. नेपोलियन यांनी सांगितले. द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे आशीर्वाद घेऊनच आपण भाजपात डेरेदाखल झालो असल्याचे ते म्हणाले.