काल संध्याकाळी ७.३० वा. सुमारास फोंड्याहून शांती नावाची मिनीबस (जीए ०१ डब्लू ४९७७) उसगावमार्गे जात असता उसगाव व खांडेपार दरम्यान, नॅस्लेजवळ रस्त्यावर उलटल्याने एकजण ठार तर ६ जण जखमी झाले.
रस्त्यावर एक गाय दिसल्याने (जी आधीच कधीतरी मरून पडली होती) तिला वाचविण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने बस उलटून पडली, असे समजते.
यावेळी बसमालकाचा मुलगा प्रवीण ऊर्फ दादा रायू नाईक (३२) जागीच ठार झाला.
जखमी झालेल्यांची नावे याप्रमाणे – जानू नवलो झोरे (६०) साईनगर तिस्क उसगाव, अशोक गर्ग (५०) नेस्लेजवळ तिस्क, सविता राया सावंत (३४) तिस्क उसगाव, सद्गुरू गावडे (३२) तिस्क, माधवी काशिनाथ गावकर (२१) धावशिरे उसगाव, चालक मौलाली कदंग गाळकर यांचा समावेश आहे.
कॉन्स्टेबल फोंड्याला गौरेश मंगलदास सांगोडकर हा मोटरसायकलवरून फोंड्याला जाताना त्याची बसला धडक बसल्याने तो जखमी झाला. दरम्यान, चालक मौलाली, अशोक गर्ग, माधवी गावकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोमेकॉत दाखल केले आहे. इतरांवर फोंड्याच्या आयआयडी इस्पितळात उपचार सुरू आहेत.