कदंब कर्मचारी वेतनाविना 

0
107

थकबाकी देण्यासही विलंब
कदंब महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडली असून महामंडळाला कर्मचार्‍यांना वेतन देणेही अवघड बनले आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्याचे वेतन कर्मचार्‍यांना मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्योकीम फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कदंबच्या कारभारात हस्तक्षेप करून कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन देण्याची मागणी केली आहे. गेल्या २५ सप्टेंबर रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतलेल्या बैठकीच्या वेळी कदंब कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन तसेच थकबाकी देण्याचे आश्‍वासन दिले होते.
परंतु सरकारला त्याची पूर्तता करता आलेली नाही. कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधीही गेल्या तीन महिन्यांत खात्यात जमा न केल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.