कंत्राटी सुरक्षा रक्षक कामावर रुजू

0
126

आपल्या मागण्यांसाठी गेल्या आठवड्यात संपावर गेलेले कंत्राटी पद्धतीवरील सुरक्षा रक्षक कालपासून सेवेत रुजू झाले. गेल्या शनिवारी सरकारने त्यांच्या मागण्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आपला संप तुर्त मागे घेतला होता.दरम्यान, कला अकादमी, गोवा वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनिक बांधकाम खाते टोंक येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे कर्मचारी काल तांत्रिक कारणामुळे सेवेत रुजू होऊ शकले नाहीत. गोमेकॉच्या अधीक्षकांनी त्यांना सेवेत रुजू करून घेण्यासंबंधीचे पत्र आपणाला मिळाले नसल्याचे सांगून सुरक्षा रक्षकांना डीनकडे पाठवले. डीननेही आपणाला पत्र मिळाले नसल्याचे सांगून त्याना रुजू करून घेण्यास नकार दिल्याचे समजते. कला अकादमी व सार्वजनिक बांधकाम खात्याने अशाच तांत्रिक कारणास्तव या सुरक्षा रक्षकांना काल सेवेत रुजू करून घेतले नाही, असे त्यांचे कामगार नेते अजितसिंह राणे यांनी सांगितले.