तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी काल काळ्या शाली पांघरून संसदेबाहेर निदर्शने केली. पश्चिम बंगालचे मंत्री मदन मित्र यांना शारदा चीट फंड घोटाळ्यात अटक झाल्याच्या निषेधार्थ ही निदर्शने करण्यात आली. यावेळी तृणमूलच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी काही खासदारांनी सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन करीत असतानाची छायाचित्रेही झळकवली. रॉय यांच्याजवळच्या डायरीत आर्थिक व्यवहार केलेल्यांत भाजप नेत्यांची नावे आढळल्याचा आरोप तृणमूलने केला आहे.