पुतीन यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

0
94

भारत आणि रशिया यांच्यादरम्यानच्या मैत्रिपूर्ण संबंधांचा संरक्षणविषयक सहकार्य हा पाया असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेल्या भेटीवेळी सांगितले. पुतीन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली त्यावेळी उभयतांत दोन्ही देशांच्या परस्पर सहकार्यासंबंधी चर्चा झाली. रशियाशी व्यापारी व आर्थिक सहकार्य करण्यास भारत सदैव तयार असल्याचे मुखर्जी यांनी त्यांना सांगितले. ऊर्जा व संरक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये रशिया भारताला सहकार्य करील असे पुतीन यांनी यावेळी राष्ट्रपतींना सांगितले.