जिहादी ट्वीटस् करणार्‍या मेहदीला पोलीस कोठडी

0
87

आयएसआयएससाठी ट्वीटर खाते चालवून जिहादींची भरती करण्यास सहकार्य देणार्‍या मेहदी मसरूर बिस्वास या भारतीय तरूणाला काल पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. एका ब्रिटीश वृत्तवाहिनीने त्याच्या आयएसआयएसशी असलेल्या कथित संबंधांचा पर्दाफाश केला होता. २४ वर्षीय बिस्वास याने आपण जिहादचा प्रचार करणारे ‘शमी विटनेस’ हे ट्वीटर खाते चालवीत होतो अशी कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम १२५ खाली देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.