भाजपतर्फे पणजीतून सिद्धार्थ कुंकळ्येकर

0
76

भारतीय जनता पक्षाचे पणजी मतदारसंघाचे उमेदवार म्हणून सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावाची घोषणा माजी मुख्यमंत्री व विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल कार्यकर्ता मेळाव्यात केली. श्री. कुंकळ्येकर हे श्री. पर्रीकर यांचे साहाय्यक होते. श्री. पर्रीकर यांनी राजीनामा दिल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.