भारतामध्ये रशिया किमान बारा अणुभट्ट्या उभारणार असून दोन्ही देशांदरम्यान काल तेल, नैसर्गिक वायू, संरक्षण, गुंतवणूक व अन्य क्षेत्रांशी संंबंधित जवळजवळ वीस करारांवर सह्या करण्यात आल्या. भारतभेटीवर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हे करार झाले. भारताची पीटीआय ही वृत्तसंस्था आणि रशियाची ‘तास’ ही वृत्तसंस्था यांच्यातही बातम्यांच्या आदानप्रदानाबाबत करार झाला आहे. मोदी व पुतीन यांच्यात संरक्षणविषयक प्रकल्पांबाबत चर्चा झाली. रशियाने आपली अत्याधुनिक हेलिकॉप्टर निर्मिती भारतात करण्याची तयारी दर्शविली असल्याचे मोदींनी सांगितले.