…म्हणूनच भाजपच्या आमदारांवरच हल्ले

0
89

कॉंग्रेस प्रवक्ते देशप्रभूंचा दावा
भाजपच्या आमदारांना एकमेकांविषयी आदर नाही, त्यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळेच त्यांच्या आमदारांवरच हल्ले होत असल्याचा दावा कॉंग्रेस प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी काल पत्रकार परिषदेत केला.सर्वप्रथम आमदार विष्णू वाघ त्यानंतर सुभाष शिरोडकर व आता कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. हल्ले करणार्‍यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. त्यामुळेच गुन्हेगारीचेही प्रमाण वाढल्याचे देशप्रभू म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानाही गुन्हे, चोर्‍या, दरोडे यावर नियंत्रण आणता आले नाही. पणजी मतदार संघाचे आमदार म्हणून शहराची दुर्दशा केली आहे. विकासाच्या बाबतीत कळंगुटचे आमदार मायकल लोबो अग्रेसर असून त्यांच्यात मुख्यमंत्री बनण्याची पात्रताही आहे, असे देशप्रभू यांनी सांगितले.
गुन्ह्यांत ४३ टक्के वाढ
राज्याचे पर्यटन धोरण पर्यटकांपेक्षा गुन्हेगारांनाच अधिक आकर्षित करणारे आहे. त्यामुळेच गेल्या ३० दिवसांच्या काळात दरोड्यांचे प्रमाण वाढल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेसच्या राजवटीचा विचार केल्यास भाजप सरकारच्या काळात ४३ टक्क्यांनी गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले.