सुरेंद्र फुर्तादोंसह तिघा कॉंग्रेस इच्छुकांचे अर्ज

0
90

पणजी पोटनिवडणूक : मोन्सेरातबाबत तर्कवितर्क
पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या तीन उमेदवारांनी काल कॉंग्रेस भवनात जाऊन अर्ज सादर केले. त्यात पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो, आर्थुर सिक्वेरा व एजिल्डा सापेको यांचा त्यात समावेश आहे.इच्छुकांकडून अर्ज सादर करण्याची काल शेवटची मुदत होती. वरील तिघांनीही अर्ज सादर केले असले तरी ऐनवेळी वेगळ्याच उमेदवाराला तिकीट देण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूत्रांकडून कळते. सांताक्रुजचे आमदार बाबूश मोन्सेर्रात पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे कॉंग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. मोन्सेर्रात निवडणूक रिंगणात का उतरत आहेत. त्यावर तर्कवितर्क व्यक्त केले जातात.
मोन्सेर्रात यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्यास त्याचा फायदा भाजप उमेदवाराला होईल, असे काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांचेही म्हणणे आहे. पुढील दिवसांत होणार्‍या राजकीय घडामोडींवर सध्या सर्वांचेच लक्ष लागले आहे.