बेकायदा पैशांच्या व्यवहारातून आमदार लोबोंवर हल्ला

0
81

राष्ट्रवादीचा आरोप : प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी
विष्णू वाघ व सुभाष फळदेसाई यांच्यानंतर हल्ला झालेले मायकल लोबो हे भाजपचे तिसरे आमदार असून यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था किती बिघडली आहे हे स्पष्ट होत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. या हल्ल्याच्या चौकशीचे तपासकाम गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.मायकल लोबो यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पक्ष निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. राज्यात आमदारांवर हल्ले होतात यावरून सामान्य जनता सुरक्षित नाही हे स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला. हा हल्ला खंडणीसाठीच्या वादातून झाल्याचा आरोपही डिमेलो यांनी केला. ‘सॅटर्डे नाईट बझार’ला परवानगी देताना बेकायदा पैशांचा जो व्यवहार झाला त्यातून हा हल्ला झालेला आहे.
हल्लेखोराने पंचायतीतील पंचांवर हल्ला करायचा सोडून ज्या अर्थी मायकल लोबो यांच्यावर हल्ला केला त्या अर्थी मायकल लोबो हे या पैशांच्या व्यवहारात गुंतले असावेत असे दिसते असेही ते म्हणाले. हल्लेखोराला एका मंत्र्यांकडून अभय मिळाले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.