विकलांगांच्या देखभाल केंद्रांना मिळणार अनुदान

0
77

योजना सरकारला सादर

मानसिक विकलांगांसाठी डे केअर केंद्रे उघडण्याच्या योजनेची चालू आर्थिक वर्षातच अंमलबजावणी होणार असून त्यासाठी योजना तयार करून ती सरकारला सादर केल्याची माहिती समाजकल्याण मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

या योजनेखाली वरील केंद्र उघडणार्‍या संस्थांना वर्षाकाठी साडेतीन लाख रुपयेपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. किमान दहा मानसिक विकलांगांना सेवा देण्याची तयारी असलेल्या संस्थांना केंद्रे उघडण्यास मान्यता दिली जाईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.

मानसिक विकलांग हा सामाजिक प्रश्‍न आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या पालकांचा भार कमी करण्याच्या हेतूनेच वरील योजना तयार केल्याचे ते म्हणाले.