बँक कर्मचार्यांचाही सहभाग
येथील कदंब बस स्थानकाजवळील क्रांती सर्कलकडून गोव्यातील कामगारांचा विराट मोर्चा आज सकाळी ९.३० वा. काढण्यात येणार असून नंतर त्याचे आझाद मैदानावर जाहीर सभेत रुपांतर होईल, अशी माहिती कामगार नेते ऍड. राजू मंगेशकर यांनी दिली.बँकांसह कामगारांच्या सर्व संघटना या मोर्चात सहभागी होणार असून कामगार विरोधी कायदे रद्दे करणे, ग्रॅच्युएटीत वाढ करणे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करणे अशा अनेक मागण्यांसाठी कामगार संघटीत झाल्याचे मंगेशकर यांनी सांगितले. सुमारे चार हजार कामगार आज राजधानीत दाखल होतील, अशी माहिती त्यांनी दिली. आज बँका बंद
दरम्यान, या मोर्चात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचा सहभाग होणार असल्याने राज्यातील बँका बंद राहणार आहेत. या मोर्चात बँक कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती या संघटनेचे राज्य सचिव हरी प्रभू यांनी दिली आहे.