जनता परिवाराचे घटक एकत्र येण्याचे संकेत

0
174

भाजपला टक्कर देण्यासाठी निर्णय
केंद्रातील भाजप सरकारला टक्कर देण्यासाठी आता जनता परिवाराच्या सर्व घटक पक्षांनी एकसंध होण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घटकांचे विलीनीकरण नवा पक्ष स्थापन करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांना देण्यात आले आहेत.मुलायमसिंग यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल या अनुषंगाने झालेल्या बैठकीत समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव, जनता दलाचे नेते नितिश कुमार व शरद यादव, जनता दल एसचे नेते एच डी देवेगौडा व आयएनएलडीचे नेते अभय चौटाला व अन्य नेते उपस्थित होते. जनता परिवारा व्यतिरिक्त अन्य पक्षांनाही सोबत घेणार असल्याचे नितीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.