बेळगावातील हॉटेल्स हाऊसफुल्ल

0
104

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन दि. ८ पासून बेळगाव शहरात होणार असल्याने बेळगावातील लहान-मोठी सर्व हॉटेल्स दि. ६ ते २६ डिसेंबर पर्यंत आरक्षित झाली आहेत. त्यामुळे लग्न समारंभ किंवा अन्य कारणासाठी बेळगाव शहरात जाणार्‍या गोमंतकियांना अन्य कुणालाही तेथे हॉटेल्स उपलब्ध होणार नाहीत.बेळगाव ही गोवेकरांची खरेदीसाठीची महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे बेळगावला कपडे व अन्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी जातात. त्याचप्रमाणे सुट्टी घालविण्यासाठीही अनेक गोमंतकीय बेळगावला जाणे पसंत करतात. सध्या चोर्ला घाटातून बेळगाव गाठणे जवळचे झाल्याने बेळगावमध्ये विश्रांतीसाठी जाणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. तेथील हॉटेलवाल्यांशी संपर्क केला असता. दि. २६ पर्यंत बेळगावला हॉटेल मिळूच शकणार नाही, असे सांगण्यात आले. बेळगावातील वर्तमानपत्रांतूनही यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.