मडगाव पालिकेने अतिक्रमणाविरुध्द मोहीम सुरू करून, रावणफोंड येथील चार रस्त्यांच्या संगमावर बेकायदेशीरपणे गाडे थाटलेल्या दोन फळविक्रेत्यांवर कारवाई केली. इमाम साब व रेहमान या दोन फळ विक्रेत्यांच्या १४ पेट्या आंबे व फळे जप्त केली. बाजार निरीक्षक मोहन आर्लेकर यांनी ही कारवाई केली. त्या संगमावर या गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.