सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्या. सी. के. प्रसाद यांची सरकारने प्रेस काऊंसिलचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. जुलै २०१४मध्ये निवृत्त झालेले न्या. प्रसाद फेब्रुवारी २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बनले होते. ५ ऑक्टोबर २०११ साली पीसीआयचे अध्यक्ष बनलेल्या न्या. मार्कंडेय काटजू यांच्या जागी न्या. प्रसाद पदभार स्वीकारतील. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचा समावेश असलेल्या समितीने प्रसाद यांची शिफारस केली होती.