कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
गोवा आर्थिक विकास महामंडळातील कर्मचार्यांच्या रास्त मागण्यांकडे व्यवस्थापन व सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्याने काल सोमवार दि. २४ पासून सर्व कर्मचार्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे महामंडळाचा प्रशासकीय कारभार ठप्प झाला आहे.कर्मचारी संघटनेने ईडीसीच्या व्यवस्थापनाकडे वेळोवेळी मागण्या ठेवल्या होत्या. मागण्याची दखल न घेतल्याने निषेध म्हणून दि. १८ नोव्हेंबरपासून सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करीत होते. त्याचाही परिणाम न झाल्याने आता ‘लेखणी बंद’ आंदोलन छेडावे लागले, असे संघटनेचे अध्यक्ष ए. एल. परब यांनी सांगितले.
मागण्या पूर्ण होईपर्यंत संप चालूच राहील, असा इशारा परब यांनी दिला आहे.