प. बंगालात राष्ट्रपती राजवट लावूनच दाखवा

0
111

ममतांचे केंद्राला आव्हान
शारदा घोटाळा प्रकरणी तृणमूल कॉंग्रेसच्या खासदाराला अटक झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारने आपल्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून आपल्याला अटक करूनच दाखवावी असे आव्हान काल दिले.तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार, आमदार, मंत्री यांच्या बैठकीत बोलताना बॅनर्जी यांनी मोदी सरकारला इशारा दिला. ‘आम्हाला मारण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही प्रत्त्युत्तर देऊ. आम्ही सर्व आव्हाने स्वीकार’ असेही त्या म्हणाल्या. भाजपाला घाबरू नका असे कार्यकर्त्यांना सांगून त्या पक्षाच्या कटकारस्थानाविरुध्द एकसंध होण्याचे आव्हान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.
प. बंगालात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शक्यतेला त्यांनी आव्हान दिले. आम्ही केंद्राच्या कारस्थानांना मतपेटीतून उत्तर देऊ. आम्ही लोकांसाठी काम करतो असे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय शत्रुत्वाविरुध्दचा आमचा लढा सुरू झाला आहे. त्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे. आम्ही त्याला प्रत्त्युत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला. आपल्या पक्षाचे खासदार श्रींजय बोस यांच्या अटकेकडे लक्ष वेधून त्या म्हणाल्या की आपण कॉंग्रेसच्या दिल्लीतील कार्यक्रमास उपस्थित राहिल्यामुळे भाजप आपल्याला लक्ष्य करीत आहे. आपल्याला भाजपकडून कोणत्याही प्रशस्तीपत्राची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या.