…तर सात केंद्रीय मंत्र्यांना बिहारात प्रवेशबंदी : मांझी

0
99

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितन राम मांझी यांनी आता बिहारमधील सात केंद्रीय मंत्र्यांनी राज्यासाठी सहकार्य न केल्यास त्यांना बिहारात प्रवेश करू देणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. या मंत्र्यांची थेट नावे मांझी यांनी घेतली नसली तरी राधा मोहन सिंग, रवी शंकर प्रसाद, रामविलास पास्वान, राजीव प्रताप रुडी, उपेंद्र कुशवाहा, रामकृपाल यादव व गिरीराज सिंग हे ते मंत्री असल्याची चर्चा आहे. या मंत्र्यांनी राज्यात शौचालये उभारण्यासाठी निधीबाबत सहाय न केल्यास त्यांना बिहारात प्रवेश करू देणार नाही असे वक्तव्य मांझी यांनी येथे आयोजित जागतिक शौचालय दिवस समारंभावेळी केले.