विदेशातील बँकांमधील काळा पैसा दडवल्याप्रकरणी येथील अंमलबजावणी संचालनालयाने काल चौगुले उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप महात्मे यांची सात तास जबानी घेतली. त्याचप्रमाणे तिंबलो खाण कंपनीचे संचालक चेतन तिंबलो, गुरुदास काणेकर व अरविंद हरदनकर यांनाही जबानीसाठी बोलावण्यात आले आहेत. कंपनीच्या मालक राधा तिंबलो यांची परवा अंमलबजावणी संचालनालयाने सात तास जबानी घेतली होती. त्यांना सात दिवसांच्या आत आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.