पगारवाढीच्या मागणीसाठी उद्या दि. २१ पासून संपावर जाण्याच्या विचारात असलेल्या राज्यातील जीवरक्षकांना सरकारने ‘एज्मा’ तथा अत्यावश्यक सेवा कायदा काल लागू केला. त्यामुळे आता हे जीवरक्षक तो लागू केलेला असतानाही संपावर जातील की काय याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूण जीवरक्षकांची संख्या ५६८ एवढी असून पर्यटन खात्याकडून कंत्राट मिळाल्यानंतर दृष्टी या संस्थेने या जीवरक्षकांची भरती केली होती. त्याना सध्या ८ हजार रु. एवढा पगार मिळत असून तो वाढवून २१ हजार रु. एवढा करावा, अशी त्यांची मागणी आहे.