चीनकडून पाक  लष्कराला प्रशिक्षण?

0
86

चीनी लष्कर आंतरराष्ट्रीय सीमेवर राजौरी सेक्टर येथे पाकिस्तानी लष्कराला शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा अहवाल सीमा सुरक्षा दलाच्या गुप्तहेर विभागाने दिल्याचे वृत्त पसरले असताना, केंद्र सरकारने मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. दरम्यान, येथे मोदींच्या चीनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी अनौपचारिक चर्चेवेळी वरील मुद्द्याचा उल्लेख आला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सयद अकबरूद्दीन यांनी स्पष्ट केले. जी २० परिषदेसाठी गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांशी भेटी घेत आहेत.