आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभेसाठी प्रचारास सुरुवात केली असून यात युवकांना केंद्रस्थानी ठेवले आहे. पक्षाने ‘दिल्ली संवाद’नावाची मोहीम उघडली असून त्याद्वारे युवकांसाठीचा पाच कलमी कार्यक्रम सर्वत्र पोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सत्तेत आल्यास दिल्लीत ८ लाख नव्या नोकर्या, व्यावसायिक प्रशिक्षण, २० नवी महाविद्यालये, क्रीडा सुविधा व दिल्लीभर वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन ‘आप’ने दिले आहे. दरम्यान, लवकरच पक्ष सर्वसमावेशक असा ५० कलमी कार्यक्रम घोषित करणार आहे.