अमल पदार्थ विरोधी पथकाने एका कारवाईत रुपये ४ लाख ४० हजार किमतीच्या १ किलो १०० ग्रॅम चरससह ८ रोजी गगन अनंतराम या २३ वर्षीय युवकाला अंजुणे येथे अटक करण्यात आली. तो मूळ हिमाचल प्रदेश येथील असून सध्या त्याचे वास्तव्य हरमल येथील लिटर इटली हॉटेलात आहे. पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप, निरीक्षक सुरज हळर्णकर, उपनिरीक्षक दिनेश गडेकर यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला ५ दिवस रिमांड देण्यात आला.