इंडिया टुडे या मासिकाच्या स्टेट ऑफ दी स्टेट राष्ट्रीय सर्वे २०१४ मध्ये छोट्या राज्यांच्या गटात गोव्याला पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. तर मोठ्या गटात हा बहुमान तामिळनाडू या राज्याला प्राप्त झाला आहे. या राज्यांनी केलेल्या विकासाच्या निकषांवर त्यांची वरील पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. गोव्याला यापूर्वीही अशा प्रकारचा बहुमान प्राप्त झालेला आहे.