उपमुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात केंद्रात मंत्रिपद द्या : शिवसेना

0
93

महाराष्ट्रात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देणे शक्य नसल्यास भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात पक्षाला आणखी एक मंत्रीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेने केली असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीविषयी अजून चर्चा सुरू असून त्याबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद व दहा मंत्रीपदे देण्याची मागणी भाजपने फेटाळली आहे. सध्या शिवसेनेची दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे.