सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. नव्या दरानुसार स्टँडर्ड सोन्याची (९९.५ शुध्दतेचे) किंमत ३० रुपयानी घसरली आहे. नवा दर प्रती १० ग्रॅम २५९५५ रुपये असा झाला आहे. सध्या तो दर २५९८५ रुपये प्रती १० ग्रॅम होता. तसेच चांदीच्या दरात ५० रुपयांनी घसरण झाली आहे. ठोक तसेच किरकोळ खरेदीत घट झाल्याने हा बदल झाला आहे.